सदा सर्वदा योग तुझा घडावा (प्रार्थना व श्लोक)
Sada Sarvada Yoga Tujha Ghadava (Prarthana & Shlokas)
आरती संग्रह
👁 3Loading…
Sukhkarta Dukhharta
Ganesh aarti in Marathi. Sung during Ganesh Chaturthi.
Also known as: गणपतीची आरती, Ganpatichi Aarti, Jai Dev Jai Dev Jai Mangal Murti
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०१)
Sukhkarta Dukhharta
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळांची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती || धृ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती || धृ ||
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती || धृ ||
Read with purity of heart and devotion 🙏
More Ganesh Aartis →सदा सर्वदा योग तुझा घडावा (प्रार्थना व श्लोक)
आरती संग्रह
👁 3पार्वतीच्या बाळा (आला रे आला गणपती आला)
आरती संग्रह
👁 1घेई छंद मकरंद
आरती संग्रह
👁 1