Loading…
Loading…
Durge Durgat Bhari
दुर्गे दुर्घट भारी तुजविणं संसारी ।।
अनाथनाथे अंबेकरुणा विस्तारी ।।
वारी वारी जन्म मरणांते वारी ।।
हरी पडलों आतां संकट निवारी ।। १ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। || धृ ||
त्रिभुवन भुवनी पाहतां तुज ऐसी नाहीं ।।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।।
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।।
ते तुं भक्तांलागी पावसी लवलाहीं ।। २ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। || धृ ||
प्रसन्नवदनें प्रसन्न होसी निजदासां ।।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशां ।।
अंबे तुजवांचुन कोण पुरविल आशा ।।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।
जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।
जय देवी जय देवी ।। || धृ ||