Loading…
Loading…
Sukhkarta Dukhharta
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळांची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती || धृ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती || धृ ||
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमुर्ती ।।
दर्शन मात्रे मनःकामना पुरती || धृ ||