शिर्डी माझे पंढरपूर
Shirdi Mazhe Pandharpur
आरती संग्रह
Loading…
Sai Babanche 11 Vachan
Sai Baba aarti in Marathi.
Also known as: साई ११ वचन, Sai 11 Vachan, Eleven Promises of Shirdi Sai, Sai Baba Promises
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान १८-१९)
Sai Babanche 11 Vachan
शिरडीस ज्याचे लागतील पाय।।
टळती अपाय सर्व त्याचे।। ०१ ।।
माझ्या समाधीची पायरी चढ़ेल।।
दुख हे हरेल सर्व त्याचे।। ०२ ।।
जरी हे शरी गेलो मी टाकून।।
तरी मी धावेन भक्तांसाठी।। ०३ ।।
नवसास माझी पावेल समाधी।।
धरा दृढ़ बुद्धि माझ्या ठायी।। ०४ ।।
नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य।।
नित्य घ्या प्रचीत अनुभवें।। ०५ ।।
शरण मज आला आणि वाया गेला।।
दाखला दाखवा ऐसा कोणी।। ०६ ।।
जो जो मज भजे जैसा जैसा भवें।।
तैसा तैसा पावें मीही त्यासी।। ०७ ।।
तुमचा मी भार वाहीन सर्वथा।।
नव्हे हें अन्यथा वचन माझे।। ०८ ।।
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास।।
मागे जे जे त्यास ते ते लाभे।। ०९ ।।
माझा जो जाहला काया-वाचा-मनीं।।
तयाचा मी ऋणी सर्वकाळ।। १० ।।
सांई म्हणें तोचि, तोचि झाला धन्य।।
झाला जो अनन्य माझ्या पायी।। ११ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Sai Baba Aartis →शिर्डी माझे पंढरपूर
आरती संग्रह
तुला खांद्यावर घेईन (साईबाबा मी शिर्डीला पाई चालत यें)
आरती संग्रह
शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दर पे सवाली
आरती संग्रह