हे भोळ्या शंकरा
He Bholya Shankara
आरती संग्रह
Loading…
Lavthavti Vikrala
Shiva aarti in Marathi. Sung during Maha Shivaratri.
Also known as: शंकराची आरती, Shankarachi Aarti, Aarti Karpura Gaura, Shiva Aarti
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०३)
Lavthavti Vikrala
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।
विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुंदर मस्तकी भाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळं तुज कर्पुर गौरा || धृ ||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतींचे उधळणं शितिकंठ नीळा ।
ऐंसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळं तुज कर्पुर गौरा || धृ ||
देवी दैत्यी सागरमंथन पें केलें ।।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ।।
तें त्वां असुरपणें प्राशन केले
नीलकंठ नाम प्रसिध्द झाले ।। ३ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळं तुज कर्पुर गौरा || धृ ||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटींचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिकल रामदासा अंतरी ।। ४ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळं तुज कर्पुर गौरा || धृ ||
Read with purity of heart and devotion 🙏
More Shiva Aartis →